मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या ‘महा’उत्सवात दिग्गजांनी सहभागी झाले आहेत. सर्व नागरिकांनीही आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन या मान्यवरांनी केले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होणार असून महायुतीच्या बड्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात मतदान केले. (PHOTO: Big leaders including Chief Minister Shinde exercised their right to vote)
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
नागपूरमध्ये भाजपाचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली पत्नी आणि मातेसह मतदान केले.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्याच्या बारामतीतील काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.
शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत मतदान केले.
अन्न आणि नागरीपुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवला येथे मतदानाचा हक्क बजावला.
विदर्भातील कोराडी येथी मतदान केंद्रावर जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी पत्नीसह मतदान केले.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांताक्रुझ येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईतील शिवडी मतदारसंघात भाजपाच्या महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख, आमदार चित्रा वाघ यांनी सहकुटुंब मतदान केले.
नांदेडमध्ये भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. (PHOTO: Big leaders including Chief Minister Shinde exercised their right to vote)