घरफोटोगॅलरीPhoto : राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

Photo : राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

Subscribe

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी भीमसागर लोटला आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला विनम्र अभिवादन केले.

- Advertisement -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे यावेळी सर्व भंते यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. तसेच राज्यपालांच्या हस्ते भंते यांचा गौरव करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. त्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

यानंतर चैत्यभूमीच्या परिसरात राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यानिमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा चित्ररूपातील जीवनपट पाहिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -