Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जीवा भावाचा माणूस! गिरीश महाजन वाढदिवस शुभेच्छा बॅनरवर अजितदादांचा फोटो; राजकीय चर्चेला उधाण

जीवा भावाचा माणूस! गिरीश महाजन वाढदिवस शुभेच्छा बॅनरवर अजितदादांचा फोटो; राजकीय चर्चेला उधाण

Subscribe

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राहणार, असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती. परंतु जळगावात लागलेल्या एका बॅनरमुळे अजित पवार पुन्हा एका चर्चेत आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामाच्या नाट्यानंतर या चर्चेवर पडदा पडला आहे. मात्र, भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो असल्यामुळे हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर अनेक वृत्तपत्रातही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिलेल्या जाहिरातीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या जाहिरातीमध्ये गिरीश महाजनांसोबत अजित पवारांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. तसेच शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो या बॅनरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता हे बॅनर झळकल्यानं दुसरा गौप्यस्फोट होणार का?, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

भाजप प्रवेशाच्या बातम्या पवार यांनी नाकारल्या असल्या तरी संशयाचे धुके कायम आहे. कर्नाटकातील निवडणुकीचा संदर्भ देत चव्हाण म्हणाले होते की, तिकडे महाविकास आघाडी करत ते आमच्याबरोबर राहतात. मात्र इथे ते काँग्रेसविरुद्ध लढतात. भाजपसोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहेत. कोण नेता येणार, कोण जाणार याच्या सतत बातम्या येत आहेत. त्यांनी काय तो निर्णय एकदा घ्यावा.


हेही वाचा : कोकणवासियांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी, ७ तासांत प्रवास शक्य


 

- Advertisment -