घरमहाराष्ट्रमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि डॉक्टर अतुल भोसलेंचा एकत्र फोटो; राजकीय समीकरण...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि डॉक्टर अतुल भोसलेंचा एकत्र फोटो; राजकीय समीकरण बदलणार?

Subscribe

सध्या गणेशोत्सव सुरू असल्यानं कराड शहरातील गणेश मंडळांना राजकीय नेत्याकडून भेटीगाठी देण्यात येत आहेत. तसंच, आरतीलाही हजेरी लावली जात आहे. मंगळवारी रात्री शहरातील बटाणे गल्लीतील एका मंडळात खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील आणि भाजपचे लोकसभा प्रभारी व कराड दक्षिणचे विधानसभा उमेदवार डॉक्टर अतुल भोसले एकत्रित पहायला मिळाले.यावेळी चक्क कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शेजारीच खुर्चीवर डॉक्टर अतुल भोसले बसले होते. त्यामुळे उपस्थितांच्या नजरा या दोघांमध्ये काय चर्चा होणार याकडे लागून होत्या. परंतु, काही मिनिटांच्या वेळेत दोघांमध्ये कोणतीही चर्चा किंवा काहीच घडले नाही. त्यामुळे राजकीय उत्सुकता लागलेली ती काही क्षणांतच संपली. (Photo of former Chief Minister Prithviraj Chavan and Dr Atul Bhosle together Will the political equation change )

कऱ्हाड तालुका हा कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन मतदार संघातील विभागला आहे. कराड दक्षिणवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचेच वर्चस्व आहे, तर कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मध्यंतरी झालेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी सहकारमंत्री आमदार पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांचे पुत्र अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली.

- Advertisement -

त्या निवडणुकीत आमदार पाटील आणि आमदार चव्हाण गटाची जुळलेली नाळ तुटली. त्यावेळी आमदार पाटील यांना भाजपचे अतुल भोसले यांनी साथ दिली. त्यामुळे त्या निवडणुकीत आमदार पाटील यांचा विजय झाला. त्याचवेळी यापुढील सर्व सहकारी संस्थांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार पाटील आणि भोसले गटाने एकत्रीतपणे लढवाव्या, अशी घोषणा त्या पॅनेलच्या ज्येष्ठांनी केली होती.

(हेही वाचा: अजित पवार लवकर मुख्यमंत्री होऊ दे; लालबागच्या चरणी आलेल्या चिठ्ठीची जोरदार चर्चा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -