किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा 2 जून 2023 रोजी पार पडणार आहे.
50 व्या शिवराज्याभिषेक सोहळाच्यानिमित्ताने आज शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांनी किल्ले रायगडावरील पूर्वतयारीची पाहणी केली.
आमदार भरत गोगावले यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनीदेखील 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी केली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सत्यजित बडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, मुख्याधिकारी महादेव रोडगे,कार्यकारी अभियंता नामदे, कट्टी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देवकाते व इतर विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1 जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 2 जून रोजी सकाळी 8:30 वाजता सोहळ्याचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रधानमंत्री यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
AIADMK पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि 'एनडीए'ची साथ सोडली
AIADMK पक्षाच्या घोषणेननंतर चेन्नेईमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा...
मुंबई : अपात्रतेसंदर्भात टंगळमंगळ सुरू आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 अमदारांच्या...
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी ही पुढील तीन आठवड्यांसाठी ढकलली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली....