घरमहाराष्ट्रभारतीय चलनांवर सावरकरांचा फोटो हवा - हिंदू महासभा

भारतीय चलनांवर सावरकरांचा फोटो हवा – हिंदू महासभा

Subscribe

भारतीय चलनांवरील महात्मा गांधीच्या फोटो ऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो वापरण्यात यावा अशी मागणी, अखिल भारतीय हिंदू महासभेनी केंद्र सरकारला केली आहे. तसेच भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावी, अशी देखील मागणी केली आहे.

भारताला स्वातंत्र मिळवून देण्यात सावरकरांनी खूप मोठे बलिदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाची परतफेड म्हणून त्यांचा फोटो भारतीय चलनावर लावण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेनी लावून धरली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनीच हिंदुत्व या शब्दाची निर्मिती केली होती. त्यांनी १९२३ साली ‘हिंदूत्व’ या ग्रंथाचे लेखन केले होते.

- Advertisement -

कालच सावरकरांची १३५ वी जयंती संपूर्ण देशात साजरी करण्यात आली होती. सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय हिंदू महासभेनी हा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -