Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रPHOTO : लोकशाहीचा 'महा'उत्साह... महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे मतदान

PHOTO : लोकशाहीचा ‘महा’उत्साह… महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे मतदान

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी आज, बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील सेलिब्रिटिंसह इतर मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होत असून महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केले. (PHOTO: Voting of major leaders of Mahavikas Aghadi)

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बारमतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह वांद्रे पूर्व येथे मतदान केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील साकोली विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसह बारामतीमध्ये मतदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी आपल्या परिवारासह बारामतीच्या काटेवाडी येथे मतदान केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब विदर्भातील ब्रम्हपुरी येथे मतदान केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये मतदान केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरे यांनी पत्नीसह दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. (PHOTO: Voting of major leaders of Mahavikas Aghadi)


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -