घरमहाराष्ट्रPHOTOS : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीनिमित्त बाबूलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

PHOTOS : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीनिमित्त बाबूलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

Subscribe

श्रावण महिना नुकताच सुरू झालेला आहे. आता श्रावणातील व्रत-वैकल्येदेखील सुरू होतील. श्रावणातील प्रत्येक वाराला एक विशेष महत्त्व आहे. या महिन्यातले सर्वात पहिले व्रत म्हणजे श्रावण सोमवारचे व्रत.

मुंबई: श्रावण महिना नुकताच सुरू झालेला आहे. आता श्रावणातील व्रत-वैकल्येदेखील सुरू होतील. श्रावणातील प्रत्येक वाराला एक विशेष महत्त्व आहे. या महिन्यातले सर्वात पहिले व्रत म्हणजे श्रावण सोमवारचे व्रत. विवाहित आणि अविवाहित महिला हे श्रावणी सोमवारचे व्रत करतात. त्यामुळे पूजा करण्यासाठी करण्यासाठी भाविकांनी बाबुलनाथ मंदिरात गर्दी केली होती. (PHOTOS Crowd of devotees in Babulnath temple on the occasion of first Shravani Monday and Nag Panchami)

बाबुलनाथ हे मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे मंदिर 12 व्या शतकात राजा भीमदेव यांनी बांधलं आहे. मरिन लाईन्स जवळच्या छोट्या टेकडीवर असून आजूबाजूला असलेल्या उंचचउंच इमारतींमुळे हे मंदिर दुर्लक्षित झालं आहे. कालांतराने हे मंदिर जमीनदोस्त झालं होतं. परंतु 1780 साली या मंदिराचे काही अवशेष सापडल्यानं या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.

- Advertisement -

दर्शनासाठी भाविकांची बाबलुनाथ मंदिरात रांग
दर्शनासाठी भाविकांची बाबलुनाथ मंदिरात रांग
श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बाबुलनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी दाखल
आज श्रावणातला पहिला सोमवार तसंच नागपंचमी असे दोन्ही योग जुळून आल्यानं भाविकांची मंदिरात मोठी गर्दी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -