घरमहाराष्ट्रधक्कादायक...तरुणीचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर केले अपलोड

धक्कादायक…तरुणीचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर केले अपलोड

Subscribe

बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्यावर तरुणीचे अर्धनग्न फोटो अपलोड केले असल्याचा गंभीर प्रकार चाकण येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्यावर तरुणीचे अर्धनग्न फोटो अपलोड केले असल्याचा गंभीर प्रकार चाकण येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुनील बांबू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; आरोपी सुनील याने एक बनावट फेसबुक अकाउंट उघडले होते. त्या अकाउंटवर प्रोफाइल फोटो म्हणून पीडित तरुणीचा फोटो लावला होता. तर या आरोपींने अकाउंटचा कव्हर फोटो म्हणून पीडित तरुणीचा अर्धनग्न फोटो ठेवला होता. तसेच पीडित महिलेचे अश्लील फोटो सुनील याने फेसबुकवर अपलोड करून तरुणीची बदनामी केली असल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत तरुणीने पोलीस स्थानकात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सुनील याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलमनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी सुनील आणि २१ वर्षीय तरुणीचे मुंबईमध्ये मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर ते पिंपरी-चिंचवड शहरात आले त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला असल्याचे घटनेच्या तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘गायीच्या दुधात सोनं असतं’; भाजपच्या नेत्याचा अजब दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -