घरताज्या घडामोडीपिंपरी चिंचवड: प्लाझ्मा दान करा २ हजार मिळवा

पिंपरी चिंचवड: प्लाझ्मा दान करा २ हजार मिळवा

Subscribe

प्लाझ्मा दान करणारे पुढे यावेत त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना प्रोत्साहनपर २ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करुन उपचार करता येतात. मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी प्लाझ्माची सुद्धा कमतरता आहे. त्याचसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने एक भन्नाट आयडिया लढवली आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्यांना बक्षीस म्हणून २ हजारांची रक्कम देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेना घेतला आहे. प्लाझ्माचा तुटवडा दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय आहे. बाहेरील रुग्णांना प्लाझ्मा मोफत देण्यात येणार आहे. शहरातील शासकीय आणि महानगर पालिकेच्या रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्यासाठी कोणाही पुढे येत नाहीत. प्लाझ्मा दान करणारे पुढे यावेत त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना प्रोत्साहनपर २ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्लाझ्मासाठी थेरपीसाठी अनेक NGO शहरात काम करत आहेत मात्र तरिही रुग्णांना प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे. प्लाझ्मामुळे अनेक रुग्णांना जिवनदान मिळत आहे. म्हणूनच प्लाझ्मा दान करणारे पुढे येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच पुण्याचा महापौरांनी अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

ज्यांना कोरोना झाला त्यातून ते ठिक झाले आहेत असेच लोक प्लाझ्मा दान करु शकतात. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांच्या शरीरातील रक्त घेतले जाते त्या रक्ताचा वापर करुन अँटीबॉडीज प्लाझ्मा वेगळे केले जातात आणि ते प्लाझ्मा कोरोना झालेल्या रुग्णांना दिले जातात. प्लाझ्मा थेरपी कोरोनाग्रास्तांसाठी उपयुक्त ठरते.


हेही वाचा – नाशिकमध्ये कामाच्या ठिकाणीही मिळणार आता लस

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -