चिंताजनक! संशयित आरोपीला कोरोना; ५ पोलीस क्वॉरंटाइन

संशयित आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने या आरोपीच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांना क्वॉरंटाइन राहण्याची वेळ आली आहे.

नाशिकरोडला दोन महिला पाॅझिटिव्ह

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या कोरोनाने आपला विळखा डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, जवान आणि पोलीस प्रशासन यांच्या भोवती गुंडाळला आहे. दरम्यान, एक चिंता वाढवणारी घटना पिंपरीमध्ये घडली आहे. एका संशयित आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर क्वॉरंटाइन होण्याची वेळ आली आहे. तसेच आधीच पोलीस आयुक्तालयातील सात जण हे करोनाबाधित आढळलेले आहेत. यापैकी, एका अधिकाऱ्याला घरी सोडण्यात आले आहे.

घरगुती भांडणातून झाला वाद

मिळालेल्या माहितीनुसार; दोन भावंडांचा घरगुती वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, या दोघांनी अक्षरश: पोलीस स्थानक गाठले. दरम्यान, त्यावेळी एकाची अदखलपात्र तक्रार घेण्यात आली होती. तर दुसऱ्याला नोटीस बजावत समजूत काढून घरी पाठवण्यात आले होते. मात्र, यापैकी एकाला सर्दी आणि खोकला झाल्याने तो औंध येथील जिल्हा रुग्णालयात गेला. त्या दरम्यान त्याची कोरोनाची तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच संशयित आरोपीच्या संपर्कात आलेल्या पाच पोलिसांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.


हेही वाचा – संगमनेरच्या दोन महिलांसह अकोल्यातील एकाला कोरोनाची लागण