घरताज्या घडामोडीपगार न दिल्याने राग अनावर, कामगाराने थेट मालकाची बाईक पळवून भर चौकात...

पगार न दिल्याने राग अनावर, कामगाराने थेट मालकाची बाईक पळवून भर चौकात जाळली

Subscribe

अंकितने वारंवार मालकाकडे पैशांची मागणी केली होती मात्र मालकाने त्याला पैसे दिले नाहीत

कोरोनाने अनेकांचे व्यवसाय ठप्प केले. अनेक कामगारांचे पगार बंद झाले. मात्र आता कोरोना प्रभाव कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक शहरांमध्ये उद्योगधंद्यांना देखील वेग आला आहे. अशातच पुण्याच्या पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad ) मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालकाने कामगाराला पगार न दिल्याने कामगाराचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या मालकाचीच बाईक पळवून भरचौकात पेटवली. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये अनेक चर्चा सुरू आहे. (Pimpri Chinchwad Worker Burned Owner’s Bike for not Paying the Salary)

दिवसा उजेडी भर चौकात बाईक पेटवून दिल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. पेटलेली बाईक पाहण्यासाठी अनेकांनी परिसरात गर्दी केली होती. काही वेळातच बाईक पेटल्याची बातमी वेगाने पसरली आणि चौकातील स्थानिक नागरिकांनी अग्निशनदलाला कळवले. घटनेची माहिती मिळताच अग्निशनदलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बाईकला लागलेली आग विझवली.

- Advertisement -

अंकित शिशुपाल असे बाईक पेटवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हा उत्तर प्रदेश येथे राहणारा असून पिंपरी चिंचवडमध्ये गणेश उंदरे यांच्याकडे काम करत होता. कोरोनाच्या काळात त्याने हालाकीचे दिसव काढले. त्याचे काम पुन्हा व्यवस्थित सुरू झाले. मात्र मालक वेळेवर पगार देत नव्हता. अंकितने वारंवार मालकाकडे पैशांची मागणी केली होती मात्र मालकाने त्याला पैसे दिले नाहीत. अखेर अंकितचा राग अनावर झाल्याने त्याने मालकाच्या बाईकवर डोळा ठेवला. आधी बाईक पळवली आणि चौकाच नेऊन बाईक पेटवली. पोलिसांनी या प्रकारची माहिती मिळताच त्यांनी फरार झालेल्या अंकितचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.


हेही वाचा – School Reopen: राज्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -