घरताज्या घडामोडीधक्कादायक! टॅटूमुळे जिवलग मित्राची हत्या

धक्कादायक! टॅटूमुळे जिवलग मित्राची हत्या

Subscribe

टॅटू एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

अंगावर टॅटू काढणे सध्या अनेकांची स्टाईल झाली असून तरुणांमध्ये याची कमालीची क्रेझ वाढली आहे. मात्र, हा टॅटू एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. टॅटूमुळे दहा वर्षाच्या मैत्रित फूट पडून त्यात मित्राची हत्या करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

पिंपरी चिंचवडमध्ये महिन्याभरापूर्वी मयुर मडके या तरुणाने ‘एमएम’ (M.M) असा टॅटू काढला होता. त्यानंतर त्याचा जिवलग मित्र मंगेश मोरेनेही त्याच आद्याक्षराचा पण, थोड्या वेगळ्या डिझाईन असलेला टॅटू काढला आणि वादाला सुरुवात झाली.

- Advertisement -

मयुर मडके आणि मंगेश मोरे हे दहा वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांचेही नाव आणि आडनाव ‘एम’ अक्षरावरुन येत असल्याने दोघांनी तसे टॅटू काढले. पण, सारखे टॅटू काढण्यावरुन दहा वर्षांच्या मैत्रीत फूट पडली. गेल्या जवळपास महिनाभर दोघांमध्ये धुसफूस सुरु होती.

दरम्यान, मंगेश मोरेने मयुर मडकेची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील भोसरी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन आरोपी मंगशे मोरेसह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश मोरेसह सातही आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे.

- Advertisement -

वेट And वॉच ओन्ली

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नसून आता मयुर मडकेच्य़ा साथीदारांनी सोशल मीडियावर ‘वेट अॅण्ड वॉच ओन्ली, रिप्लाय फिक्स’, असे धमकीचे मेसेज व्हायरल केले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आणखी एक घातपात होण्याआधीचे हे प्रकरण तडीस नेण्याचे आव्हान आहे.


हेही वाचा – दहावीच्या विद्यार्थांना १७ ऑगस्टपासून मिळणार गुणपत्रिका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -