घरमहाराष्ट्रजेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देऊन केला गर्भपात

जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देऊन केला गर्भपात

Subscribe

पिंपरी-चिंचवडच्या राहटणीमध्ये पत्नीच्या नकळत पतीने गर्भपात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात २८ वर्षीय पत्नीने पती विरोधात तक्रार दिली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राहटणीमध्ये पत्नीच्या नकळत पतीने गर्भपात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात २८ वर्षीय पत्नीने पती विरोधात तक्रार दिली आहे. संदीप अरुण पवार असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याने जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देऊन पत्नीचा गर्भपात केल्याचा आरोप आहे.याप्रकरणी अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत. गेल्या वर्षीपासून संदीपचे पत्नीसोबत खटके उडत होते. तो पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. त्याने पत्नीला मारहाण देखील केली असल्याचे पोलीस फिर्यादीत म्हटले आहे.पीडित पत्नी ही बँकेत नोकरी करते तर आरोपी संदीप हा वाहनचालक आहे.दोघांंचे अजिबात पटत नव्हते. पती संदीपने पत्नीला जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून संदीप हा पत्नीला हडपसर येथे राहण्यास आग्रह करत होता.मात्र पत्नी काळेवाडी येथे राहात होती.दोघांत यावरून देखील भांडण झाले होते. संदीपने माहेरहून पैसे आणण्याचा पत्नीकडे तगादा लावला होता.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी.बाबर हे करत आहेत.


स्वाईन फ्लू’मुळे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

Pregnant woman
प्रातिनिधिक फोटो (सौजन्य – टाईम)

पुणे । ’स्वाईन फ्लू’मुळे भोसरी येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये ’स्वाईन फ्लू’ने दोन बळी घेतले असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला दि. १६ ऑगस्टला चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १८ ऑगस्टला तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली होती. अखेर उपचारादरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला असून बळींची संख्या ६ वर पोहचली आहे. आज अखेर शहरात ’स्वाईन फ्लू’चे ३४ रुग्ण आढळले असून त्यातील सातजणांची प्रकृती गंभीर आहे. महापालिकेकडे सध्या ’स्वाईन फ्लू’च्या लसीचा व गोळ्यांचाही तुटवडा आहे. याचा ताण महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयावर येत आहे. त्यासाठी प्रशासानाने स्थायी समितीकडे तातडीची बाब म्हणून ’स्वाईन फ्लू’च्या गोळ्या व लस खरेदीचा प्रस्ताव मांडला आहे. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

- Advertisement -

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

water tapपुणे | महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथे विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने. शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पाणीपुरवठा बंद असणा-या भागांमध्ये पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकूंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डडाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्ठहे नंबर 42 व 46 कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, तर वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -