मनसेचे खड्ड्यात पिंडदान

नाशिक : शहरातील नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड ची सध्या मोठी दुरावस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रहदारीसाठी वाहन चालकांना तसेच रस्त्या च्या बाजूला असलेल्या सर्व दुकानदारांना व्यवसाय करताना धुळीच्या अडचणींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे यासंदर्भात रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केलेली आहे पालिकेने दुरुस्ती चे काम हाती घेतले आहे परंतु ते अत्यंत धिम्या गतीने सुरू असुन कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकुणच महापालिकेच्या वतीने नागरिकांना अपेक्षित असे कामकाज होत नसल्याकारणाने आज पित्र पंधरवडा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावरती पिंडदान करत उपहासात्मक ‘पिंडदान आंदोलन’ करण्यात आले.

शहरातील रस्त्यात खड्डा आहे खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज असंख्य अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाव लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने हे पिंड दान आंदोलन करण्यात आले. रस्ते तात्काळ दुरुस्त करावे अन्यथा भविष्यात मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी  देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक रोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, संतोष पिल्ले, सुरेश घुगे, संतोष सहाने, रोहन देशपांडे, विनायक पगारे, प्रमोद साखरे, नितिन धनापुणे, नितिन पंडित, मयूर कुकडे, अशोक ठाकरे, रंजन पगारे, दत्ता कोठुळे, अजिंक्य जाधव, दिलीप सोनकांबळे, शहर अध्यक्ष भानुमति आहिरे, रीणा सोनार, रागिणी कोदे, दीपाली कदम, डिंपल गुप्ता, भाऊसाहेब ठाकरे, अविनाश कदम संदीप कदम, बाबा गोडसे, दिलीप लवटे, तानाजी सहाणे, सुलोचना रणदिवे आदिंसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.