Wednesday, June 9, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कंपनी आग दुर्घटना! मालक निकुंज शहांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

कंपनी आग दुर्घटना! मालक निकुंज शहांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Related Story

- Advertisement -

मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असलेल्या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याचे सांगत एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आले. या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली आहे. त्यानंतर कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांमध्ये महिला कामगार अधिक आहेत.

- Advertisement -

मृतांचे नातेवाईक 24 तासांपासून ससून रुग्णालयाबाहेर
आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांचे सर्व मृतदेह ससून रुग्णालयात आणण्यात आले आहेत. त्यानंतर मृतांचे नातेवाईक मध्यरात्रीपासून रुग्णालयात थांबून होते. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम होते. मात्र, रुग्णालयात दाखल झालेल्या नातेवाईकांपैकी कुणाचाही डीएनए घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी जाण्यापेक्षा आमच्या भावना समजून घ्याव्यात, अशी प्रतिक्रिया नातेवाईक व्यक्त करत आहेत.

- Advertisement -