घरCORONA UPDATECoronavirus: देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी, प्रकृतीत सुधारणा

Coronavirus: देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी, प्रकृतीत सुधारणा

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला असून ते मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहेत. फडणवीस यांच्या प्लाझ्मा थेरपीने उपचार केले असल्याची बातमी टीव्ही ९ या वृत्तावाहिनीने दिली आहे. रविवारी फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी देखील त्यांना पुन्हा प्लाझ्मा थेरपीचा डोस दिल्याचे सांगण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९३ पर्यंत खाली आली होती. त्यानंतर फडणवीस यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. सध्या फडणवीस यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची देखील माहिती मिळत आहे. फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे हॉस्पिटल प्रशासन त्यांची विशेष काळजी घेत आहे.

- Advertisement -

जळगावच्या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना सांगितले होते की, जर मला कोरोनाचा संसर्ग झाला तर मी सरकारी रुग्णालयातच उपचार घेणार. आपले शब्द खरे करत फडणवीस सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस लवकर बरे व्हावेत, असे वक्तव्य केले होते. आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान विरोधकाच्या रुपता हवा आहे. त्यामुळे फडणवीस लवकर बरे होऊन आमच्या विरोधात उतरतील, अशा खास शुभेच्छा राऊत यांनी दिल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -