घरमहाराष्ट्रदगाफटका केला तर धडा शिकवू

दगाफटका केला तर धडा शिकवू

Subscribe

शरद पवारांचा आमदारांना धीर

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाने सोमवारी वेगळे वळण प्राप्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थापन केलेल्या सरकारविरोधात महाशिवआघडीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपल्याकडे पुरसे संख्याबळ असल्याचा ओळख परेड करीत भाजपावर निशाणा साधला. यावेळी १६२ आमदारांना पक्षांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली . तर यावेळी अजित पवारांवर टीका करताना उपस्थित आमदारांना विश्वासात घेत ज्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यांना कोणताही अधिकार नाही, ज्यांना पद जाईल असा धोका वाटतो, त्यांनी काळजी करू नये, त्यांची जबाबदारी मी स्वत: घेतो, असे सांगत त्यांनी आमदारांच्या मनातील शंका दूर करताना १६२ आमदारांच्या अधिक मतांनी आपण विश्वादर्शक ठराव जिंकू असा दावा देखील शरद पवारांनी यावेळी केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह तिन्ही पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते, मित्र पक्षांचे अबू आझमी, शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित सर्व आमदारांना संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षनिष्ठ राहण्याची शपथ दिली. या कार्यक्रमानंतर सर्व आमदारांची रवानगी पुन्हा हॉटेलात करण्यात आली आहे.

- Advertisement -

यावेळी भाजपने नव्याने स्थापन केलेल्या सरकारवर विशेषत: अजित पवारांवर टीकेची झोड उठविताना शरद पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले. ते यावेळी , बहुमत नसताना त्यांनी चुकीच्या रितीने सत्तास्थापन केली आहे. तर हा गोवा नाही तर महाराष्ट्र आहे, कोणतीही चुकीची गोष्ट खपवून घेणार नाही, असा सज्जड दम त्यांनी यावेळी लगाविला.

ज्या व्यक्तीला पक्षाने पदावरून दूर केले आहे, त्या व्यक्तीला पक्षाबाबत कोणताही निर्णय घेण्यास अधिकार नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी अजित पवारांवर निशाण साधला.

- Advertisement -

आमदारांना भीती दाखवली जातेय, अजित पवार व्हिप काढून बाजूने वळवतील, पण ज्यांना पक्षाने पदावरुन हटवले आहे, परंतु,व्हीप काढण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटतो, त्यांनी काळजी करु नये, त्यांची जबाबदारी मी स्वत: घेतो . तुमचे सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका, तुमची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे. व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला केलेल्याला नाही असे स्पष्ट करीत त्यांनी यावेळी उपस्थित आमदारांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेना आपल्या सोबत असल्याचा आठवण करुन देताना ते म्हणाले की, हे महाराष्ट्र आहे, इथे काहीही खपवून घेतले जात नाही. आपण योग्यला योग्य म्हणतो, जे योग्य नसताना लादण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला धडा शिकवण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे. आता आपल्यासोबत शिवसेना आहे, त्यामुळे धडा शिकवण्याबाबत जास्त बोलण्याची गरज नाही,’ असे ही शरद पवार यावेळी म्हणाले.

मी पुन्हा येईन, नाही, आम्ही पुन्हा आलो आहोत.

यावेळी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आज तिन्ही पक्षांचा विस्तार लक्षात घेता येथे आलेल्या फोटोग्राफरला वाईल्ड फ्रेमची गरज आहे. हे दृश्य पाहून जर कोणाच्या डोक्यात प्रकाश पडणार नसेल तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगाविताना त्यांनी मी पुन्हा येईल, असे म्हणणार नाही. आम्ही आलेलो आहोत. मध्ये आलात तर काय करायचं ते करण्यासाठी समर्थ आहोत. आडवे येण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर करुनच पाहा. शिवसेना काय आहे हे पाहायचं असेल तर त्याचीही आमची तयारी आहे, असे सांगताना त्यांनी भाजपला लक्ष्य केले. तर आता भाजपकडून हात-पाय मारण्याचा जो केविलपणाचा प्रयत्न चाललाय, त्यामुळे आम्ही अजून घट्ट होऊ. आमदार फक्त खुर्च्या उबवण्यासाठी एकत्र आलेले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्‍या शक्तीला मातीत गाडण्याची सुरुवात आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रातून करत आहोत, असा सज्जड दम उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -