पंतप्रधानांचा पुण्यातील नायडू हॉस्पिटलच्या नर्सला कॉल, कामगिरीचे केले कौतुक

PM calling

कस काय तुम्ही बरे आहात ना ? तुम्ही स्वतःची काळजी घेत आहात ना ? तुम्ही झोकून आणि मनापासून काम करताय, अशावेळी कुटुंबाला काळजी वाटते ना ? कुटुंब काळजी करते का ? अशी विचारणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील नायडू हॉस्पिटलच्या नर्ससोबत आज टेलिफोनिक संवाद साधला. तुमच्यासारखे लाखो हात काम करत आहेत, जे मला काम करण्यासाठी खूप ऊर्जा देतात अशा शब्दात त्यांनी या नर्सचे आभार मानले. नायडू हॉस्पिटलमधील छाया जगताप या नर्सने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान आणि छाया जगताप यांच्यातील टेलिफोनिक संवाद

आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या नागरिकांना आश्वासन देतो की होय तुम्ही बरे व्हाल. रिपोर्ट पॉझिटीव्ह येऊद्या किंवा निगेटीव्ह, आम्ही रूग्णांना दिलासा देतो की तुम्ही घाबरायच नाही अस आम्ही रूग्णांना सांगतो. मग त्यांना धीर येतो. सुरूवातीला रूग्ण खूपच घाबरलेले असतात. पण एकदा त्यांचा आत्मविश्वास वाढला की रूग्ण उपचाराला प्रतिसाद देतात असे छाया जगताप यांनी पंतप्रधानांना सांगितले. आम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान लाभले आहेत ही आम्हा देशवासीयांसाठी गर्वाची बाब आहे असेही त्या म्हणाल्या. देशभरात करोनाविरोधातील लढाई लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना संदेश देताना छाया जगताप म्हणाल्या की करोनाला हरवायचय, देशाला जिंकवायच आहे.

अनेकदा पेशंटचे नातेवाईक काळजी करतात, नाराजी व्यक्त करतात. भेट न मिळाल्याने चिडचिड होते. पण या आजारामुळे आम्ही कोणालाही क्वारंटाईन वॉर्डमध्ये कोणालाही प्रवेश देत नाही. संपुर्ण हॉस्पिटलने करोना रूग्णाच्या सेवेसाठी वाहून घेतल्यासाठी पंतप्रधानांनीही त्यांचे कौतुक केले. देशासाठीच कर्तव्य म्हणून मीदेखील तुमच्यासारखीच जबाबदारी पार पाडतोय असेही पंतप्रधान म्हणाले.