घरमहाराष्ट्रPM MODI : विजयाची Hat-Trick लगावल्यानंतर पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

PM MODI : विजयाची Hat-Trick लगावल्यानंतर पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Subscribe

देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाले. यामध्ये भाजपला तेलंगणा वगळता तीन राज्यात घवघवीत यश मिळाले. या यशानंतर केलेल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता.

सिंधुदुर्ग : छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या तीन राज्यांमध्ये कमळ फुलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवार (4 डिसेंबर) रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते सिंधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. अशातच महाराष्ट्रातील विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर ते काय भाष्य करतात हे पहावे लागणार आहे. (PM MODI After scoring a hat-trick of victory Prime Minister Modi on the Maharashtra tour today)

देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाले. यामध्ये भाजपला तेलंगणा वगळता तीन राज्यात घवघवीत यश मिळाले. या यशानंतर केलेल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. हे होत नाही तोच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते सिंधुदुर्ग येथे आयोजित विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -

नौदल दिन कार्यक्रमाला लावणार हजेरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, ते सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली असून, दोन ते तीन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. असे असतानाच पंतप्रधान मोदी तीन राज्यात मिळालेल्या घवघवी यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील विरोधकांवर कोणत्या शब्दांत हल्ला चढवतात हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : TELANGANA DGP : तेलंगणाच्या महासंचालकांना ‘ती’ एक चूक पडली महागात, ECI ने केली निलंबनाची कारवाई

- Advertisement -

दरवर्षी साजरा केल्या जातो नौदल दिन साजरा

भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर रोजी संपूर्ण देशभर साजरा केल्या जातो. या दिवशी नौदलाकडून प्रात्यक्षिके सादर केली जातात. यंदाचा नौदल दिन मालवण-तारकर्ली समुद्रातील बलाढ्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केल्या जाणार आहे. नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम तारकर्ली एमटीडीसी येथील समुद्र किनारी होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलचे वरिष्ठ अधिकारी, अन्य वरिष्ठ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने नौदलाचा ताफा तारकर्ली समुद्रात दाखल झाला असून, संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

हेही वाचा : MP Election Analysis : मोदींकडून झंझावती प्रचार, चौहानांची ‘लाडली’; हाच ठरला BJP विजयाचा फॅक्टर

किल्ल्याबद्दल या गोष्टी जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या हयातीतच जंजिरा किल्ल्याप्रमाणेच कोकणातील सिंधुदुर्ग येथे सिंधुदुर्ग किल्ला उभारला. मालवण, तारकर्लीला गेलेला प्रत्येक व्यक्ती निळाशार समुद्रातील भक्कम सिंधुदुर्ग पाहण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. सिंधुदुर्ग हा जलदुर्गांमधील सर्वात मोठा आणि आकर्षक किल्ला आहे. या किल्ल्यावरूनच या जिल्ह्याला सिंधुदुर्ग असे नाव पडले आहे. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणतः तीन किलो मीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -