PM Narendra Modi Birthday: देशाचा लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. पंतप्रधान मोदी आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून भाजपकडून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह राबवला जाणार आहे. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला. एका सामान्य कुटुंबात जन्मलेले पंतप्रधान मोदी आज जगातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. RSS चे प्रचारक म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची सुरूवात झाली. हळूहळू ते भाजप आणि आरएसएसचे नेते म्हणून उदयाला आले. (PM Modi Birthday From zero to peak Prime Minister Narendra Modi s 73rd birthday today)
पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी 2001 ते 2014 दरम्यान 12 वर्षांहून अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं.
विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 73 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी विश्वकर्मा जयंतीही आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदींची राजकारणातील सुरूवात वयाच्या 8 व्या वर्षी झाली. लक्ष्मणराव इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली RSS ज्युनियर कॅडेट म्हणून त्यांनी या प्रवासाला सुरूवात केली. लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे गुरू आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तरुणपणी पंतप्रधान मोदींना संत बनण्याची इच्छा होती. त्यांनी जवळजवळ दोन वर्षे हिमालयात एकांतात वेळ घालवला होता. जिथे त्यांनी ध्यान करत हिंदू धर्माचं तत्वज्ञान स्वीकारलं. नरेंद्र मोदी 2001 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तेव्हा त्यांना विधानसभेत एकही जागा नव्हती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले भारतीय पंतप्रधान म्हणून मान मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचनाची आणि कविता करण्याची आवड आहे. त्यांनी गुजरातमध्ये अनेक कविता लिहिल्या आहेत. पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा 13 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नव्हती.
(हेही वाचा: दुष्काळी मराठवाड्यात सरकारी घोषणांचा कोरडा पाऊस; वड्डेटीवारांचा हल्लाबोल )