घरताज्या घडामोडीcorona updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; पंतप्रधान मोदी साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

corona updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; पंतप्रधान मोदी साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

Subscribe

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सरकारनं नागरिकांना निर्बंध आणि मास्क मुक्त केलं. मात्र, देशाच्या अनेक भागांत अजुनही कोरोनाचा प्रदुर्भाव कायम आहे. अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सरकारनं नागरिकांना निर्बंध आणि मास्क मुक्त केलं. मात्र, देशाच्या अनेक भागांत अजुनही कोरोनाचा प्रदुर्भाव कायम आहे. अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पुन्हा एकदा जागं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत मोदी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत.

देशात कोरोना रुग्णांचा कमी झालेला धोका पुन्हा वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज ही बैठक घेणार आहेत. मागील दोन आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राइव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग यावर सादरीकरण करणार असल्याचं समजतं. या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याचे आवाहन करू शकतात. दरम्यान, कोविड संदर्भात पीएम मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशातील कोविडची परिस्थिती समजून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत.

राज्यात पुन्हा मास्क सक्ती?

- Advertisement -

कोरोनाचे वाढत असलेले रुग्ण पाहता राज्यात मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक असल्याचे प्रस्तावात अधोरेखित करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेत मास्कचा वापर आवश्यकच असून, किमान गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करावे, असे टास्क फोर्स सदस्यांचे म्हणणे आहे. विशेषतः चित्रपटगहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी मास्कसक्ती असावी, असे मत या सदस्यांनी मांडले. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वतःला घरातच विलग करत आहे. अनेकजण आरटीपीसीआर करणे टाळत असून, त्या चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


हेही वाचा – जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट, टास्क फोर्सचा मास्क सक्तीचा प्रस्ताव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -