घरमहाराष्ट्रकाही लोकांच्या बेईमानीमुळे अडीच वर्षे डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

काही लोकांच्या बेईमानीमुळे अडीच वर्षे डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांचे मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईच्या बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. यानंतर थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन होईल, तसेच मुंबई महापालिकेच्या प्रकल्पांचं लोकापर्ण होणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. मला आठवतयं की, 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी याच ठिकाणी म्हटलं होत की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्रात बदल घडवून आणला आहे आणि आता पुन्हा डबल इंजिनचं सरकार आणलं आहे. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिनचे सरकार आणले. पण काही लोकांच्या बेईमानीमुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही, अशा शब्दात फडणवीसांना ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी पंतप्रधान मोदीचं कौतुक करत फडणवीस म्हणाले की,  पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधान मोदी सगळीकडेच लोकप्रिय आहेत पण दाव्यासह सांगतो की, लोकप्रियतेची कोणती स्पर्धा झाली तर आपल्या लोकप्रियतेमध्ये नंबर 1 वर मुंबई असेल. एवढं प्रेम मुंबईकरांचं तुमच्यावर आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांचे खरे अनुयायी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली आणि… 

मला आठवतयं की, 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी याच ठिकाणी म्हटलं होत की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्रात बदल घडवून आणला आहे आणि आता पुन्हा डबल इंजिनचं सरकार आणलं आहे. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिनचे सरकार आणले. पण काही लोकांच्या बेईमानीमुळे गेल्या अडीच वर्षे डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला आहे, पण बाळासाहेबांचे खरे अनुयायी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली आणि आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या जना-जनातील आणि मना-मनातील सरकार तयार झाले. यानंतर महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने जोरात धावत आहे, असही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू केली नाही

आज अनेक कार्यक्रमांचे, प्रकल्पांचं भूमिपूजन केलं जाणार आहे. पण यात कोणती महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, प्रधानमंत्री स्व:निधीचा कार्यक्रम. राजकारण कसे असते? पाहा कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी फुटपाथवर राहणारे, दुकानदार, फेरीवाले, पानवाले या सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्व:निधीची रचना केली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पण त्या बैठकीत गरिबांसाठीची योजना स्थगित केली, आणि ही योजना लागू केली जाणार नाही असेल सांगितले. यानंतर आम्ही केंद्रीय राज्यमंत्र्यासह एक बैठक घेतली, या बैठकीत आम्ही मुंबईतील १ लाख ठेला लावणारे, फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांना स्व:निधीचा फायदा दिला.

- Advertisement -

मोदी एकमेव पंतप्रधान असतील ज्यांनी…

आज मला सांगण्यास आनंद होत आहे की, मुंबईत एक लाखांचा आकडा पार करून 1 लाख 15 हजारांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. आज मुंबईतील ठेला लावणारे, हातगाडी, टपरीधारकांना, फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांना या स्वनिधीचा फायदा मिळतोय, मुंबईसह इतर ठिकाणीही आता स्व:निधी योजनाचा फायदा मिळणार आहे. मोदी एकमेव पंतप्रधान असतील ज्यांनी ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं, असही फडणवीस म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -