Homeमहाराष्ट्रPM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई, नवी मुंबई दौऱ्यावर; वाहतुकीत केले...

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई, नवी मुंबई दौऱ्यावर; वाहतुकीत केले हे बदल

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बुधवारी (15 जानेवारी) मुंबई तसेच नवी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशामध्ये शहरातील वाहतूक विभागाच्या वतीने नवी मुंबईच्या वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार असून यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर पंतप्रधान मोदी हे दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर येत असून यावेळी ते महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. यावेळी दोन तासाच्या या बैठकीसाठी महायुतीमधील सर्व मंत्री आणि आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. (PM Modi on Mumbai Tour traffic diverted due to program)

हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराडचे पुण्यात दोन फ्लॅट एका महिलेच्या नावावर; दोघांचा संबंध काय 

नवी मुंबईतील वाहतुकीत होणार हे बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ओवे गाव पोलीस ठाणे ते जे कुमार सर्कल तसेच ग्रीन हेरीटेज येथे दोन्ही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. असे असले तरीही या काळात VIP वाहने, पोलीस वाहने तसेच आपत्कालीन वाहनांचा प्रवेश मात्र या मार्गावर सुरुच राहणार आहे. तसेच, या मार्गावरील वाहतूक ही दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आली आहे. तसेच, गुरुद्वारा चौक ते जे. कुमार सर्कल मार्गे बी.डी. सोमाणी शाळा, आणि इस्कॉन मंदिराच्या गेट क्रमांक 1 आणि गेट क्रमांक 2 हे रस्ते फक्त व्हीआयपींसाठी खुले ठेवले जाणार आहेत.

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा

सकाळी 10.30 च्या सुमारास मुंबईच्या नौदल गोदी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी तसेच आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रर्पण होणार आहे. त्यानंतर नौदल गोदीमध्येच महायुतीचे मंत्री आणि आमदारांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटनही होणार आहे.