Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र इंधन दरवाढीचा निषेध; पंतप्रधान मोदींना भेट दिल्या गोवऱ्या आणि मातीच्या चुली!

इंधन दरवाढीचा निषेध; पंतप्रधान मोदींना भेट दिल्या गोवऱ्या आणि मातीच्या चुली!

Related Story

- Advertisement -

महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ सप्टेंबरला सामान्य माणसाला मोठा धक्का बसला. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य लोकांच्या घराचे बजेट कोलमडले आहे आणि यामुळे सामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. यादरवाढीचा सर्वच शहरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कोल्हापुरात इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापुरातील जनसंघर्ष सेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट गोवऱ्या आणि मातीच्या चुली भेट देण्यात आल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार पेठ पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे या गोवऱ्या आणि चुली मोदींसाठी देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. अवघ्या १५ दिवसात विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसचे दर स्थिर असताना केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही फसवणूक असून लॉकडाऊन, कोरोना निर्बंधांमुळे सामान्य माणसाला जगणं कठीण होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने केलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

- Advertisement -

सण-उत्सवाच्या तोंडावर अचानक करण्यात आलेली दरवाढ ही महागाईला फोडणी आहे. आठ महिन्यात तब्बल 28 टक्के दरवाढ झाली असून या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करताना जनसंघर्ष सेनेकडून म्हटले जात आहे. यासह कोल्हापूरातील उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्‍शन मोफत दिल्याची जाहिरात करणाऱ्या केंद्र सरकारने येत्या काही दिवसात ही दरवाढ रद्द न केल्यास पेट्रोल पंपावरील फलक फाडण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


- Advertisement -