Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता कमीच

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता कमीच

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

Related Story

- Advertisement -

लोकसभा आणी राज्यसभा निवडणुकीपूर्वी मोठे नेते काही विषयांवर चर्चा करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेट तशीच आहे. त्याचा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली असावी. बड्या नेत्यांनी एकमेकांची भेट घेणे हा सामान्य प्रघात आहे. चर्चेत राजकीय भूकंपाची शक्यता ही फारच कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीला एकत्र राहावेच लागेल, हे स्पष्ट आहे. पक्षीय मतभेद आणि अंतर्गत वाद हे नवीन नाहीत. प्रत्येक पक्षात मतभेद दिसत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निर्बंध शिथिलतेची गरज

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि ज्यांनी मास्क लावलेले आहेत, अशा व्यक्तींना काही नियमांतर्गत निर्बंधांतून सवलत देण्याची गरजही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. नियमांतून शिथिलता न दिल्यास हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती वाईट होईल, अशी भीतीही त्यांनी वर्तवली.

- Advertisement -