घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; मुख्यमंत्री शिंदेंकडून तयारीची पाहाणी

पंतप्रधान मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; मुख्यमंत्री शिंदेंकडून तयारीची पाहाणी

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (19 जानेवारी 2023) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वांद्र्यातील वांद्रे कुर्ला संकलातील मैदानात सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळाची पाहाणी केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (19 जानेवारी 2023) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वांद्र्यातील वांद्रे कुर्ला संकलातील मैदानात सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळाची पाहाणी केली. या पाहाणीनंतर एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी विविध प्रकल्पांचे उद्धाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत, असे सांगितले. (PM Modi to visit Mumbai tomorrow Chief Minister Eknath Shinde inspected the preparations)

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या मुंबईत दौरा आहे. मुंबई महापालिकेतील विविध विकासाची कामं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 7 एसटीपीचे भूमीपूजन आहे. जे मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच, काँक्रिटचे रस्ते आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तीन रुग्णालयांचे भूमिपूजन, केंद्र सरकारच्या स्वनिधी योजनेतून १ लाख फेरिवाल्यांना चेक दिले जाणार, मुंबईचे सुशोभिकरण यांसह विविध प्रकल्पांचे उद्धाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत”, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

“या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन उद्या होणार असल्याने याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. त्या तयारीची पाहाणी आज केली. आज संध्याकाळपर्यंत बीकेसी मैदानातील सर्व तयारी पूर्ण होईल. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उद्या मोठ्या संख्येने लोकं उपस्थित राहतील”, असा विश्वासही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा

  • पंतप्रधान सुमारे 38,800 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
  • पंतप्रधान सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2ए आणि 7 चे लोकार्पण करतील.
  • पंतप्रधान मुंबई 1 मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1)चा प्रारंभ करतील.
  • पंतप्रधान सुमारे 17, 200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी करतील.
  • मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून, पंतप्रधान 20 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना’चे उद्घाटन करतील.
  • 360 खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थ नगर रुग्णालय, आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम, या पंतप्रधान मोदी मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
  • पंतप्रधान मोदी मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्प सुरू करतील.
  • पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. या प्रकल्पासाठी 1,800 कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे.
  • पंतप्रधान मोदी स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करतील.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -