पंतप्रधान मोदींची पगडी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; विरोधानंतर पगडीवरील ओळीत बदल

pm modi visit dehu prime minister modis saint tukarams pagadi changed

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात खास मोदींसाठी पुण्याच्या मुरूडकर झेंडेवाले यांनी डिझायन केलेली पगडी तयार करण्यात आलीय. वारकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ही पगडी विशेष आहे. मात्र मोदींसाठीची ही पगडी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे पुण्यातील ही पगडीवरून नेमका राजकीय वाद का उफाळून आला ते जाणून घेऊ…

पुण्यातील पुणेरी, पेशवाई पगडीपासून ते फुले पगडीवरून महाराष्ट्रात राजकारण अनेकदा तापल्याचे पाहायला मिळाले. यात आता पंतप्रधान मोदींसाठी तयार केलेली पगडी देखील पुन्हा वाद सापडली आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू इथे येणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींना देहू संस्थानच्या वतीने मुरूडकर झेंडेवाले यांनी डिझायन केलेली पगडी तयार भेट म्हणून दिली जाणार आहे. झेंडेवाले यांनी मोदींसाठी तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार केले आहे. या पगडीवर वारकऱ्यांची छाप दिसून येतेय. या पगडीच्या मध्यभागी अभंगाच्या दोन ओळीसुद्धा लिहिण्यात आल्या होत्या. मात्र या अभंगांच्या ओळीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे मोदींच्या पुणे प्रवेशाआधीही ही पगडी ट्रेन्ड करू लागलीय. (pm modi visit dehu)

आधी तयार करण्यात आलेल्या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी लिहिले होते. मात्र या ओळींवर काहींनी आक्षेप घेतल्यानंतर आता देहू संस्थानाने ओवी बदलल्या आहेत. आता या पगडीवर ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशा अभंगाच्या ओळी टाकण्यात आल्या आहेत. आता हीच पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली.

या पगडीवर तुळशीच्या माळांची सजावट असणार आहे. या पगडीची केस आणि स्टँडही वैशिष्ट पूर्ण बनविण्यात आला आहे. पगडीचा स्टॅडच्या दोन्ही बाजूला लोड आहे. तसेच वर चीपळ्या ठेवण्यात आल्या असून त्याला टाळांची सजावटही करण्यात आलीय. ऑफ व्हाईट रंगाची ही पगडी असून याच कापडाचे मोदींना उपरणेही बनविण्यात आले आहे.

यापुर्वीही पुण्यातील फेट्यावरून राजकारण तापले होते. पुण्यातील मेट्रो उद्धाटन कार्यक्रमासाठी खास पंतप्रधान मोदींसाठी हा फेटा तयार करण्यात आला होता. या फेट्यावर शिवमुद्रा होती. आणि याच शिवमुद्रेवरून अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर फेट्यावरुन शिवमुद्रा काढून टाकण्यात आली होती.

हा फेटासुद्धा मुरुडकर फेटेवाले यांनीच तयार केला होता. त्यावेळी शिवमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तिचा अशा पद्धतीने वापर करत मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असल्याचे दाखवण्याचा हा प्रकार आहे, असे काँग्रेसने म्हटले होते. त्यामुळे वाद टाळण्यासाठी फेट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा काढून टाकण्यात आली. काँग्रेसह अनके पक्षांनी त्यावेळी फेट्यावरील शिवमुद्रावरून भाजपवर आरोप केले. यात आता पुन्हा या पगडीनिमित्त नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


मलिक आणि देशमुख पुन्हा उच्च न्यायालयात, विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी जामिनाचे आवाहन