घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी पश्चिम बंगालसह ओडिशा दौऱ्यावर, यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकासानीची करणार पाहणी

पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालसह ओडिशा दौऱ्यावर, यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकासानीची करणार पाहणी

Subscribe

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडीशा आणि बंगालमधील २१ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

तौत्के चक्रीवादळ आल्याच्या एक आठवड्यामध्येच देशाला यास चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. पुर्व सागरी किनारपट्टीवरील राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसला आहे. यामुळे ओडीशा, पश्चिम बंगालसारख्या राज्यांना यास चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसानीचा फटका बसला आहे. दोन्ही जिल्ह्यांत जिवीत आणि वित्तहानी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) ओडीशा आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये दोन्ही राज्यांमधील नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करुन आढावा घेणार आहेत. यापुर्वी तौत्के चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकासान झाले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात दौरा केला होता.

पश्चिम बंगाल आणि ओडीशा या दोन राज्यांना सर्वाधिक यास चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी पंतप्रधान मोदी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वात पहिले पंतप्रधान ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे पोहचणार आहेत. याठिकाणी पंतप्रधान मोदी नुकसानीची आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर ओडीशा राज्यातील बालासोर आणि भद्रक भागाची पाहणी करतील तर पश्चिम बंगालमध्ये पूर्व मिदनापुर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेणार आहेत. तसेच दिल्लीला रवाना होण्यापुर्वी मोदी बंगालमध्ये आढावा बैठक घेणार आहेत.

- Advertisement -

यास चक्रीवादळादरम्यान ओडीशा आणि बंगालमध्ये अतिवृष्टी झाली होती. चक्रीवादळाच्या वेळी १४५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहत होते. जोरदार वाऱ्यामुळे काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. यास चक्रीवादळामध्ये ४ लोकांचा मृत्यूही झाला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडीशा आणि बंगालमधील २१ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते.

यास चक्रीवादळामुळे ओडीशामध्ये ३ लोकांचा मृत्य झाला आहे. तर बंगालमध्ये एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे १ करोड लोकांचे नुकसान झाले असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या सरकारने केला आहे. तौत्के चक्रीवादळामुळे देशातील पाच जिल्हायांना तडाखा बसला होता तर यासमुळे २ राज्यांना फटका बसला आहे. यास चक्रीवादळ झारखंडकडे वळले होते परंतु झारखंडमध्ये थोड्या प्रमाणात नुकसान झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -