घरताज्या घडामोडीगरीबांच्या सक्षमीकरणातील त्यांचे योगदान स्मरणीय; पंतप्रधान मोदींकडून बाळू धानोरकरांना श्रद्धांजली

गरीबांच्या सक्षमीकरणातील त्यांचे योगदान स्मरणीय; पंतप्रधान मोदींकडून बाळू धानोरकरांना श्रद्धांजली

Subscribe

बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर सर्वच काँग्रेसचे नेतेमंडळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर खासदार बाळु धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज बाळू धानोरकर यांनी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर सर्वच काँग्रेसचे नेतेमंडळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. (PM Narendra Modi CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis Tribute to Congress MP Balu Dhanorkar)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळू धानोरकरांना श्रद्धांजली

- Advertisement -

चंद्रपूर वरोरा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने एक तरुण, तडफदार आणि लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या अतीव दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाळू धानोरकरांना श्रद्धांजली

- Advertisement -

चंद्रपूरचे लोकसभेचे खासदार बाळूभाऊ नारायणराव धानोरकर यांच्या निधनाने दु:ख झाले. सार्वजनिक सेवा आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान स्मरणात राहील. ओम शांती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाळू धानोरकरांना श्रद्धांजली

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चंद्रपूर जिल्ह्याने जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एक नेता गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगात आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ओम शांति.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -