Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मोदी-ठाकरे भेट राजकीय तडजोडीसाठी नाही - बाळासाहेब थोरात

मोदी-ठाकरे भेट राजकीय तडजोडीसाठी नाही – बाळासाहेब थोरात

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात बंद दाराआड ३० मिनिटं चर्चा झाली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बंद दाराआड बैठकीच्या चर्चेला काहीच अर्थ नाही आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुख्यमंत्री आणि आमची आघाडी चांगलं काम करत आहे. पुढे देखील दूरपर्यंत आम्ही चांगलं काम करू. मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. काही विषय हे दोघांमध्ये चर्चा करण्यासारखे असतात. याआधी दोन पक्षाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांच्या भेटींचा इतिहास आहे. त्यामुळे पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटींचं वेगळं समीकरण मांडू नये, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. आम्ही तीन पक्षांनी चर्चा करून कोणते विषय घेऊन जायचे, के चर्चा करायची ठरवलं होतं, असं स्पष्टपणे थोरात यांनी सांगितलं.

- Advertisement -

यावेळी थोरात यांनी विरोधकांच्या टीकेला देखील उत्तर दिलं. शिष्टमंडळाने जे ११ विषय मांडले त्यापैकी ९ विषय हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात, असं विरोधकांनी म्हटलं आहे. यावर बोलताना थोरात यांनी टीका करणं विरोधकांचं कामचं आहे, असं म्हटलं. बोलायला काय…काहीही बोलता येतं. त्यांनी थोडासा बारीक अभ्यास केला…मी असं समजतो की त्यांना पण राज्य शासन कसं चालतं समजतं, केंद्राच्या काय जबाबदाऱ्या असतात हे समजतं. त्यांनी थोडासा बारीक अभ्यास केला तर हे केंद्राशी निगडित जे विषय आहेत तेच घेऊन गेले, असं थोरात म्हणाले.

 

- Advertisement -