Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर टेक-वेक 'मनकी बात'मध्ये पंतप्रधान करणार मोठी घोषणा, सोशल मिडिया सोडण्याचा करणार उलगडा

‘मनकी बात’मध्ये पंतप्रधान करणार मोठी घोषणा, सोशल मिडिया सोडण्याचा करणार उलगडा

Subscribe

मनकी बातमध्ये पंतप्रधान करणार मोठी घोषणा, सोशल मिडिया सोडणार सोडण्यामागचा उलघडा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

मी माझी सर्व प्रकारची सोशल मिडिया अकाऊंट्स बंद करण्याच्या तयारीत आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्युब ही सर्व अकाऊंट्स मी येत्या रविवारी बंद करत आहे. तुम्हा सर्वांनाच याबाबतची अधिक माहिती देईन असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. पंतप्रधान २००९ मध्ये आपले ट्विटरचे सोशल मिडिया अकाऊंट ओपन केले आहे.

दिल्ली दंगलीनंतर नमो टार्गेट 

दिल्ली दंगलीच्या कालावधीत तसेच दंगलीनंतर झालेल्या सोशल मिडियावरील वैयक्तिक टीका टिप्पणीनंतर त्यांनी ही घोषणा केली असल्याचे समजते. दिल्ली दंगलीनंतर त्यांनी ३ दिवसांनंतर दिल्लीवासीयांना शांततेचे आवाहन केले होते. त्यामुळेच ट्विटरपासून अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर नरेंद्र मोदी यांच्यांवर टिकेची झोड उडवली होती. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर ५ कोटी ३३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर इन्स्टाग्रॅमवर ३ कोटी ५२ लाख आणि फेसबुकवर ४ कोटी ४७ लाख फॉलोअर्स आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान यांनी २६ फेब्रुवारीला दिल्लीवासीयांना केलेल्या ट्विटमध्ये कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला होता. ही ट्विट १८ हजार वेळा रिट्विट करण्यात आली होती. तर एक लाखांहून अधिक लाईक्स या ट्विटसाठी मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ तसेच विरूद्ध अशा कमेंट्सचा पाऊस पडला होता. मोदी समर्थक विरूद्ध मोदी विरोधक असे फॉलोअर्स आणि ट्विटर वापरकर्ते या संपुर्ण ट्विटच्या निमित्ताने भिडलेले पहायला मिळाले. या ट्विटच्या माध्यमातून दिल्ली दंगलीचे अनेक फोटो शेअर करत नरेंद्र मोदी यांनाच थेट टार्गेट करण्यात आले.

- Advertisement -

 

राहुल गांधी यांची खोचक टीका

सोशल मिडिया, ट्विटर सोडू नका, द्वेष सोडा असा खोचक सल्लाही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निमित्ताने दिला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट पाठवून नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

- Advertisment -