घरमहाराष्ट्र'महाराष्ट्रातील कोरोनास्थिती हाताबाहेर, मोदींनी राज्यात आरोग्य आणीबाणी लावावी'

‘महाराष्ट्रातील कोरोनास्थिती हाताबाहेर, मोदींनी राज्यात आरोग्य आणीबाणी लावावी’

Subscribe

महाविकास आघाडी सरकारला काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाच्या माजी आमदाराने या सरकारला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात आर्थिक आणि आरोग्य आणिबाणी लावावी, अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी लिहिलं आहे. देशमुख यांच्या पत्रामुळे सरकारला घेरण्याची विरोधकांना चांगली संधी मिळाली आहे.

राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. राज्यात कोरोनामुळे ६० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम ३६० अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांची आणीबाणी लावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. देशमुख यांच्या मागणीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय उत्तर देतात हे पाहण महत्त्वाचं असणार आहे.

- Advertisement -

सरकारविरोधी वक्तव्य केल्याने प्रदेशाध्यक्षांनी कारवाई करावी – वडेट्टीवार

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आशिष देशमुख यांच्या मागणीचा समाचार घेतला आहे. सरकारविरोधी वक्तव्य केल्याने प्रदेशाध्यक्षांनी कारवाई करावी, असं वडेट्टीवार म्हणाले. पक्षात स्थान नसल्याने देशमुख यांची खदखद आहे. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सांगून त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल अशा येग्य ठिकाणी स्थान द्यावं, अशी मागणी मी करणार आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -