घरमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधातील लढाईचं केलं कौतुक

पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधातील लढाईचं केलं कौतुक

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन चर्चा केली. महाराष्ट्रातली कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली. गेले काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असं म्हणत महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधातील लढाईचं कौतुक केलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

- Advertisement -

Cowin अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी पाठवलं होतं केंद्राला पत्र

कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अ‍ॅप्लिकेशन वापरु द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -