पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार; 2 वंदे भारत एक्स्प्रेसना दाखवणार हिरवा झेंडा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जानेवारी 2023 रोजी मुंबई दौरा केला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 2 अ, मेट्रो 7, आणि 400 किमी काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांचं भूमीपूजन आणि विविध प्रकारच्या विकासकामांचे उद्घाटन मोदी यांनी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत एका समुदायाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी येणार आहेत. त्यावेळी सीएसएमटी येथे 15 मिनिटांच्या कार्यक्रमात मोदी यांच्याकडून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pm Narendra Modi To Visit Mumbai On February 10 To Flag Off Two Vande Bharat Express Trains)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जानेवारी 2023 रोजी मुंबई दौरा केला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 2 अ, मेट्रो 7, आणि 400 किमी काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांचं भूमीपूजन आणि विविध प्रकारच्या विकासकामांचे उद्घाटन मोदी यांनी केले. अशातच पुन्हा एकदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून सीएसएमटी येथून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीएसएमटी-साई नगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधूनही पाच तास 55 मिनिटांचा प्रवास होणार आहे.

  • देशभरात चालवण्यात येणाऱ्या वंदे भारतची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे.
  • जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असणार आहेत.
  • प्रत्येक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये 16 एसी डबे आहेत.
  • एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार 128 इतकी आहे.

मुंबई ते शिर्डी मार्गावर लवकरच धावणार ‘वंदे भारत’

सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस गुरुवार वगळता आठवड्यातील 6 दिवस धावणार असून 5 तास 55 मिनिटांचा प्रवास होणार आहे. सीएसएमटीतून सायंकाळी 6:15 वाजता सुटून रात्री 12:10 मिनिटांनी पोहोचणार आहे. दादर, ठाणे, नाशिक रोडला थांबा आहे.

सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता आठवड्यातील 6 दिवस धावेल. सोलापूर येथून सकाळी 06:05 मिनिटांनी सुटून दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबणार आहे.


हेही वाचा – राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज समारोप, 21 पक्षांना निमंत्रण