पंतप्रधान मोदींचा 11 डिसेंबरला महाराष्ट्र दौरा; या दोन मोठ्या प्रकल्पांचे करणार उद्धाटन

pm modi instructed to avoid unnecessary statements regarding the minority community mukhtar abbas naqvi

गुजरात निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्धाटन केले जाणार आहे. ज्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारकडून मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी राज्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जो विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. मात्र गेल्या वर्षी या प्रकल्पातील कमान कोसळून मोठा अपघात झाला होता. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई देखील पाहायला मिळाली. मोदी येत्या 11 डिसेंबरला नागपूर मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्धाटन करणार आहेत. यातून मोदी महापालिका निवडणूकांपूर्वी नागपूरला दोन मोठे प्रकल्प गिफ्ट देणार आहेत.

मुंबई नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या 55 हजार 335 कोटी रुपयांच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाने 13 राष्ट्रीयकृत बँकांकडून तब्बल 28 हजार कोटींचे कर्ज घेतले, याची परतफेड आता टोलच्या माध्यमातून केली जाणार आहे. या कर्जाची परतफेड मुदत 25 वर्षांची आहे.

महामार्गाची प्रकल्प किंमत कमी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने 2313 कोटी 56 लाख रॉयलटीत सूट दिली आहे. तसेच महामार्ग पूर्ण होऊन टोल सुरु होईपर्यंत या कर्जावर 6396 कोटी 18 लाख व्याज रस्ते महामंडळ देणार आहे.