छत्रपती संभाजीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. रविवारी ते नायजेरियामध्ये पोहचले आहे. पंतप्रधान कार्यालयाने उशिरा रात्री समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यावर गेले आहे. नायजेरियासह ते ब्राझील आणि गुयाना या देशांना भेटी देणार आहेत. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
देशात कितीतरी मोठ्या समस्या असताना पंतप्रधान विदेश दौऱ्यावर गेल्यामुळे अंबादास दानेवे यांनी टीका केली आहे. सोशल मीडियावर टीका करताना दानवे उपरोधिकपणे म्हणाले की, पंतप्रधान मोदी विमानात बसले तेव्हा वाटले की ते मणिपूरला चालले, मात्र ते नायजेरियात गेले. पुरस्कार घेण्यासाठी ते परदेशात गेले.
उत्तर प्रदेशातील झांसी येथे झालेल्या अग्निकांडमध्ये आतापर्यंत 12 बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हदरला आहे. एवढी मोठी दुर्घटना देशात घडल्यानंतर पंतप्रधान पुरस्कार स्वीकारण्यासाठी नायजेरिया, ब्राझीलमध्ये गेले आहेत. यावरुन विरोधी पक्ष नेत्यांनी निशाणा साधला. तसेच मणिपूरमध्ये अजुनही हिंसाचार भडकलेला आहे.
मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हिंसाचार अधिक भडकला आहे. कट्टरतावाद्यांनी जिरीबाम येथे 8 नोव्हेंबरला एका महिलेची हत्या केली. तर 11 नोव्हेंबरला सीआरपीएफच्या चौकीवर हल्ला करण्यात आला. बोरोबेकरा येथे घरे आगीच्या भक्षस्थानी देण्याची घटना घडली. या संबंधी देखील पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
देशात अशा अग्नितांडव सुरु असताना पंतप्रधान पुरस्कार स्वीकारण्यासाठी विदेश वारी करत असल्यावरुन दानवेंनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान विमानात चढताना मला त्या प्रत्येक पायरीवर एक-एक मृतदेह दिसत होता. त्यावर पाय देऊन पंतप्रधान विमानत चढत असल्याचे वाटत होते.
पंतप्रधान मोदी विमानात बसले, देशाला वाटलं माणिपूरला चालले.. मात्र ते नायजेरियात पुरस्कार घेण्यासाठी जाऊन बसले!
झाशी येथे १० बालकांचा करूण अंत होतो.. माणिपूरला नव्याने हिंसा पेटते, माणसे मरतात.. पण या घटनांवर एक शब्दही न उच्चरता परदेशी मेजवान्या झोडण्यासाठी पंतप्रधान मोदी निघून…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 18, 2024
Edited by – Unmesh Khandale