घरमहाराष्ट्रमोदींचा भाऊ आळंदीतल्या गुटखाकिंगच्या भेटीला

मोदींचा भाऊ आळंदीतल्या गुटखाकिंगच्या भेटीला

Subscribe

आळंदीत देशविदेशातून अनेक भाविक ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जेष्ठ बंधु सोमाभाई मोदी यांनी आळंदीत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधीचे आणि आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी चऱ्होली येथील साई मंदिरात दर्शन घेतले. देशात महागाईने जनता त्रस्त झाली असतानादेखील यावेळी सोमाभाई म्हणाले की, ‘अच्छे दिन आले असून आणखी किती अच्छे दिन यायला हवेत, सर्व फुकट द्यायचे का?’ तसेच इंधन दरवाढ व पर्यायाने होणाऱ्या महागाईला त्यांनी युपीए सरकारला जबाबदार आहे. पेट्रोल,डिझेलच्या किंमतीचे धोरण युपीए सरकारच्या काळात ठरले आहे. त्यामुळेच इंधन दरवाढ होत आहे. मात्र, आगामी निवडणूकीला विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नसल्याने ते भाववाढीचा मुद्दा काढत असल्याची टिका सोमाभाई मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थोरल्या बंधूंनी आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, साईबाबा देवस्थान यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सोमाभाई म्हणाले मी गुजरातवरुन खास माऊलींचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो आहे. याचवेळी माऊलींची पालखीदेखील पद्मावती मंदीराकडे हरिनामाचा गजर करीत मार्गस्थ झाली. या पालखी सोहळ्यात सोमाभाईंनी काही वेळी सहभाग घेतला.

- Advertisement -

देवदर्शनानंतर सोमाभाई मोदी गुटखाकिंगच्या भेटीला…

आळंदी नगरपरिषदेवर भाजपाच्या तिकिटावर निवडुक लढवित असताना गुटखाकिंग सागर बोंरुदिया वादग्रस्त ठरले होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाला मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले होता. आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधु सोमाभाई मोदी यांनी गुटखाकिंग सागर बोंरुदिया याच्या कार्यालयात भेट दिल्यामुळे आळंदी – गुजरात कनेक्शनची चर्चा रंगू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -