घरमहाराष्ट्र'दिवान बिल्डरला ४० टक्के फंड दिल्यामुळे पीएमसीवर निर्बंध'

‘दिवान बिल्डरला ४० टक्के फंड दिल्यामुळे पीएमसीवर निर्बंध’

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध आणल्यामुळे पीएमसी बँकचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी बंद असणार आहेत. दरम्यान, या निर्बंधामुळे ९.१२ लाख खातेदारांचे कोट्यवधी पैसे बँकेत अडकले आहेत. त्यामुळे खातेदारांवर मोठे संकट ओढावले आहे. दरम्यान, पीएमसी बँकेवर ही परिस्थिती का ओढवली? याचे कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. गुरुवारी किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाची परिस्थिती का ओढवली, त्यामागील कारण स्पष्ट केले आहे. ‘पीएमसी बँकेने दिवान नावाच्या बिल्डरला ३० ते ४० टक्के फंड दिल्यामुळे पीएमसीवर ही परिस्थिती ओढावली’, असे किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

दोषींविरोधात कारवाई व्हावी – किरीट सोमय्या

‘एकाच बँक होल्डरला ३० ते ४० टक्के पैसे दिल्यामुळे ही परिस्थिती ओढावली. मी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांनी सांगितले की, यासंदर्भात रिझर्व्ह बँकेशी चर्चा करणार आहोत. मी देखील रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांसोबत शनिवारी याविषयी चर्चा करणार आहे. छोट्या गुंतवणुकदारांना आणि १ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्यांनी हा गोंधळ माजवलाय त्यांच्या विरोधात कारवाई होणार. ही कारवाई अजून उशिरा केली असती तर ३० ते ४० टक्क्यांचा फंड ६० टक्क्यांवर गेला असता. हा गैरप्रकार आहे. याप्रकरणात सगळेच डायरेक्टर चोर नाहीत. मात्र, जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी’, असे किरीट सोमय्या म्हणाले.


हेही वाचा – ‘दिल्लीपुढे म्हणजे नेमके कुणापुढे झुकणार नाहीत शरद पवार?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -