घरताज्या घडामोडीपुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Subscribe

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची देखभाल आणि दुरुस्तीच्या काम करण्यात येणार आहे. या दुरूस्तीच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्व भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची देखभाल आणि दुरुस्तीच्या काम करण्यात येणार आहे. या दुरूस्तीच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्व भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारी १९ जानेवारीला शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. (pmc decided to stop water supply in pune city on thursday 19 january for repair work of pipeline)

शहरातील भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, दोन्ही होळकर जलकेंद्र, एसएनडीटी-चतु:श्रृंगी, कोंढवे-धावडे जलकेंद्र आणि वडगांव जलकेंद्रांमध्ये पालिकेच्या वतीनं देखभालीचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळं गुरुवारी पुण्यात कोणत्याही भागात पाणीपुरवठा होणार नाही आहे. त्यानंतर शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारीला उशिरा अनेक भागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सर्व पेठांचा भाग, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनर, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, गुरूगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, कालवा रस्ता, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहसनगर, पाषाण या भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याशिवाय सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, रेणूकानगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जयभवानीनगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव, येवलेवाडी श्रावणधारा झोपडपट्टी, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, वकीलनगर, करिष्मा सोसायटी, शिवाजीनगर, गोखलेनगर आणि मॉडेल कॉलनी या भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल; राऊतांचा केशव उपाध्येंना इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -