घरताज्या घडामोडीPNB Scam चौकशीत उचलबांगडी झालेले नवे ATS प्रमुख विनीत अग्रवाल कोण आहेत...

PNB Scam चौकशीत उचलबांगडी झालेले नवे ATS प्रमुख विनीत अग्रवाल कोण आहेत ?

Subscribe

विनित अग्रवाल यांना महाराष्ट्र एटीएस प्रमुखपदी जबाबदारी

दहशतवाद विरोधी पथकाचे जयजीत सिंह यांच्या निमित्ताने ठाण्याला नवीन पोलिस आयुक्त मिळाला आहे. पण ठाणे पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी स्विकारण्या आधीच जयजित सिंह यांच्याकडे जबाबदारी होती ती म्हणजे राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाची. ही महत्वाची जबाबदारी आता नव्या ऑर्डरनुसार १९९४ बॅचचे महाराष्ट्र कॅडर चे आयपीएस अधिकारी असलेले विनीत अग्रवाल यांच्याकडे सोपावण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार एटीएस प्रमुख पदी विनीत अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीएनबी बॅंक घोटाळ्यात हवा असलेल्या नीरव मोदी यांच्याविरोधातील तपासातही महत्वाची अशी जबाबदारी ईडीचे विशेष महासंचालक म्हणून विनीत अग्रवाल यांनी सांभाळली होती. परंतु याच घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान त्यांना केंद्रातून महाराष्ट्रात पाठवण्यात आले. पण ही तडकाफडकी बदली का करण्यात आली याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. केंद्रात नियुक्तीवर असणाऱ्या विनीत अग्रवाल यांना पुन्हा महाराष्ट्रात का पाठवण्यात आले हा नंतर कधीच चर्चेला आला नाही.

कोण आहेत विनीत अग्रवाल ?

विनीत अग्रवाल यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी मिळण्याआधी प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग अशी जबाबदारी होती. आता नव्या आदेशानुसार त्यांच्याकडे अपर पोलिस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य अशी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी विनीत अग्रवाल यांनी मुंबईसह पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कामकाज बघितले आहे. त्यानंतर ते प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथे गेल्यानंतर त्यांना केंद्रीय अन्वेषण विभाग तसेच केंद्रीय तपास यंत्रणेतील महत्वाची भूमिका बजावली आहे.
विनीत अग्रवाल यांची केंद्रात नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतले सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे पीएनबी बॅंक घोटाळ्यातले हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे प्रकरण. ईडीचे विशेष संचालक म्हणून जबाबदारी असणारे विनीत अग्रवाल या घोटाळ्याची चौकशी होती. ईडीचे विशेष संचालक असताना महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळेच विनीत अग्रवाल यांच्याकडे पीएनबी घोटाळा प्रकरणही आहे. अतिशय स्वच्छ आणि सरळमार्गी अधिकारी म्हणून विनीत अग्रवाल यांच्या नेतृत्वात या प्रकरणातील तपास सुरू होता.
पण या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात निपक्ष तपास करीत असताना २०१७मध्ये त्यांची अचानक ईडीतून बदली करण्यात आली. पाच वर्षे केंद्रात नियुक्तीवर असलेले विनीत अग्रवाल यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यात आले. गृहविभागाचे प्रधान सचिव म्हणून त्याची राज्यात बढती देण्यात आली. अप्पर पोलीस महासंचालक असलेले विनीत अग्रवाल यांना सोमवारी एटीएस प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले.

मॅनेजमेंट ग्रॅज्युएट ते राष्ट्रपती पदक विजेता

भारतीय पोलीस सेवेत येण्यापूर्वी विनीत अग्रवाल यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात स्वताची कारकीर्द निर्माण केली होती. मॅनेजमेंट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर   दिल्लीच्या आयआयटीतून त्यांनी इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले आहे. १९९४मध्ये भारतीय पोलीस सेवेत आल्यानंतर अग्रवाल यांनी महाराष्ट्र आणि केंद्रात महत्वाची पदे भूषवली आहेत. त्यांच्या गुणवंत सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पदक तसेच केंद्रीय गृहमंत्रालय देण्यात येणारे सुरक्षा पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -