घरमहाराष्ट्रप्रसिद्ध सोने व्यापारी पु. ना. गाडगीळ यांची कोट्यावधींची फसवणूक

प्रसिद्ध सोने व्यापारी पु. ना. गाडगीळ यांची कोट्यावधींची फसवणूक

Subscribe

आरोपी रोहितकुमार शर्माविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध सोने व्यापारी पु.ना.गाडगीळ यांची कोट्यावधींची फसवणूक झाल्याची धक्कादायक घडली आहे. चंढीगडमध्ये व्यवसाय सुरु करुन देण्याची बहण्याने पुण्यातील पु. ना. गाडगीळ यांची १ कोटी ६० लाख ५० हजार रुपयांची फसवणुक झाली आहे.  याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी आरोपी रोहितकुमार शर्मा विरोधाक गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी रोहितकुमार शर्माने गाडगीळ यांना विश्वासात घेत चंढीगडमध्ये व्यवसाय सुरु करुन देण्याचा बनाव केला. आणि कर्ज वितरण आणि प्रक्रिया शुल्कासाठी एकूण १ कोटी ६० लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम गडप केली. ही संपूर्ण घटना ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान घडली. त्यामुळे अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे गाडगीळ यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रोहित शर्मा यांने पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सची शाखा चंदीगढमध्ये सुरु करण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत गाडगीळ यांच्या पुण्यातील कार्यालयात येऊन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्यात हे पैशातील व्यवहार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -