पोलीस उपायुक्तांच्या परवानगीनंतरच पोक्सो, विनयभंगाच्या गुन्ह्याची नोेंद; मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

गेल्या काही दिवसांत जुन्या भांडणात, प्रॉपर्टी वाद आणि आर्थिक व्यवहारांसह वैयक्तिक कारणावरून विविध पोलीस ठाण्यांत विनयभंगासह पोक्सोंतर्गत दाखल होणार्‍या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास केल्यानंतर यातील बहुतांश गुन्हे बोगस असल्याचे उघडकीस आले होते.

after one year maharashtra did not get full time director general of police

विनयभंगासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करताना आता प्रत्येक पोलीस ठाण्याला पोलीस उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या कलमांतर्गत दाखल होणार्‍या गुन्ह्यांमध्ये काही गुन्हे बोगस असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गुरुवारी नवीन आदेश जारी करताना पोलिसांनी संबंधित गुन्हे दाखल करताना पोलिसांना विशेष दक्षता घेण्यास सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांत जुन्या भांडणात, प्रॉपर्टी वाद आणि आर्थिक व्यवहारांसह वैयक्तिक कारणावरून विविध पोलीस ठाण्यांत विनयभंगासह पोक्सोंतर्गत दाखल होणार्‍या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास केल्यानंतर यातील बहुतांश गुन्हे बोगस असल्याचे उघडकीस आले होते. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची अनेकदा पोलिसांकडून शहानिशा होत नाही.तक्रार आल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदविला जातो. संबंधित आरोपीला अटक केली जाते, मात्र चौकशीत तो गुन्हा बोगस असल्याचे नंतर पोलिसांच्या निदर्शनास आले होते. अटकेमुळे आरोपीच्या बदनामीने समाजातील त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो, असे पांडंचे म्हणने आहे.

सर्व पोलीस ठाण्यांना आदेश

अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना आदेश जारी केले आहेत. त्यात अशा प्रकारे कुठलीही तक्रार आल्यास त्याची माहिती आधी सहाय्यक पोलीस आयुक्तांना देण्यात यावी. त्यांच्या शिफारसीनंतर संबंधित गुन्ह्यांची फाईल पोलीस उपायुक्तांकडे पाठविली जावी. पोलीस उपायुक्तांच्या परवानगीनंतरच पोलिसांनी या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करावा, असे आपल्या आदेशात म्हटले आहे. अशा तक्रारीची योग्य ती शहानिशा करून गुन्हा दाखल करताना दक्षता घ्यावी, असेही आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले आहे.