घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमतपत्रिकांवर कविता, शेरोशायरी; पदवीधरांच्या निवडणुकीत १३ हजार मते बाद

मतपत्रिकांवर कविता, शेरोशायरी; पदवीधरांच्या निवडणुकीत १३ हजार मते बाद

Subscribe

नाशिक : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतपत्रिका बाद होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले. विशेष म्हणजे अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर कविता, कोणी शेरोशायरी तर कोणी वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केल्याने मतपत्रिका बाद ठरली. झालेल्या मतदानाच्या सुमारे वीस टक्के मते बाद ठरल्याने यातून पदवीधरांचे अज्ञान दिसून येते. तसेच, सुशिक्षितांची निवडणूक म्हणून ओळख असलेल्या निवडणुकीत तब्बल १२ हजार ९९७ मते बाद झाली आहेत.

पदवीधर निवडणुकीत मतदानासाठी पसंतीक्रमानुसार उमेदवाराची निवड करण्यात येते. या निवडणुकीकरीता मतदान केंद्रात दिलेल्या पेनानेच मतदान करणे बंधनकारक असते. तसेच आपल्या पसंतीच्या उमेदवासमोर फक्त एकाच उमेदवारासमोर एक हा अंक लिहीणे आवश्यक होते. मतदान प्रक्रियेविषयी निवडणुक विभागाकडून पदवीधर मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान केंद्राबाहेर मतदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही लावण्यात आल्या होत्या. मात्र तरीही मतमोजणी दरम्यान बाद झालेल्या मतपत्रिकेवरून पदवीधरांचे अज्ञान समोर आले. यातील काही मतपत्रिकांवर तर चक्क कविता लिहीलेल्या दिसून आल्या. तर काही मतपत्रिकांवर शेरोशायरी लिहीण्यात आली होती. अनेक मतदारांनी सर्वच उमेदवारांपुढे एक हा पसंतीक्रम दिल्याचे दिसून आले. तर काहींनी चूक आणि बरोबरच्या चिन्हाचा वापर केलेला दिसून आला. अशिक्षित मतदारांकडून अशा प्रकारच्या चुका एकवेळ मान्य करता येतील परंतू पदवीधर मतदारांकडूनही अशा प्रकारे चुका करण्यात आल्याने मतदारांचे अज्ञानच यातून समोर आले.

- Advertisement -
बाद मतांचे प्रमाण अधिक

निवडणुकीत १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलावर १७ कप्पे बनविण्यात उमेदवाराच्या अनुक्रमांकानुसार मतपत्रिका त्या त्या कप्प्यांमध्ये टाकण्यात येत होत्या. यात सत्यजित तांबे यांचा अकरावा तर शुभांगी पाटील यांचा अनुक्रमांक हा चौदावा होता. दरम्यान दोन्ही ठिकाणी मतपत्रिका मोठ्या प्रमाणावर पडतांना दिसून येत होत्या.17 वा नंबर बाद मतांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर मतपत्रिका पडतांना दिसून आल्या.निवडणुकीत १६ पैकी फक्त तांबे आणि पाटील या दोन उमेदवारांमध्येच काँटे की टक्के राहणार असून यामध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात हा सामना बघायला मिळणार आहे. तर दुसरीकडे पहिल्या फेरीतील मतमोजणी दरम्यान अवैध मतांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -