घरताज्या घडामोडीमनसेचे भोंगे काही तासांतच पोलिसांनी उतरवले, अन् कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

मनसेचे भोंगे काही तासांतच पोलिसांनी उतरवले, अन् कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Subscribe

‘मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही. पण मशिदीवरील भोंगे उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाही तर ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील, त्या मशिदीसमोर स्पीकर लावून हनुमान चालिसा लावू,’ असा इशारा काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतिर्थावर दिला होता. त्यानंतर आज मनसैनिक मशिदींच्या भोंग्यांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आजपासून घाटकोपरमध्ये भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात केली. मात्र काही तासांतच पोलिसांनी मनसेकडून लावण्यात आलेले भोंगे उतवले असून काही मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर भोंगे सुरू करून हनुमान चालीसा सुरू करण्यात आली. मनसेचे विभागीय अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे भोंगे लावून हनुमान चालीसा सुरू करण्यात आली. हनुमान चालीसा संदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही नियम लावले नाहीत. फक्त कालच्या भाषणातील राज यांचे आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालीसा सुरू करण्यात आली. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने काही तासांतच मनसेकडून लावण्यात आलेले भोंगे पोलिसांकडून उतरवले. तसेच महेश भानुशालींसह काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान ज्यावेळेस भोंगे लावण्यात आले होते, त्यावेळेस महेश भागनुशाली एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ‘राज ठाकरे यांचा आदेश आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून त्याचे पालन करणे हा माझा धर्म आहे. म्हणून आजपासून मी त्याची सुरुवात केली आहे. दररोज येथे भोंग्यांवर हनुमान चालीसा, गायस्त्री मंत्र आणि गणपतीची आरती वाजणार आहे. यामुळे कोणताही तणाव निर्माण होणार नाही. हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांचे भोंगे वाजतात तेव्हा तणाव निर्माण झाला का कधी? मग हिंदू धर्माची आरती वाजली तर तणाव का? आम्ही आमच्या धर्माचा प्रचार करतोय.’

- Advertisement -

हेही वाचा – कालचा शिवतिर्थावरचा भोंगा भाजपचा होता, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -