धक्कादायक! घरात घुसून पुतण्याने केली काकाची हत्या

घरात घुसून काकाची हत्या करणाऱ्या पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Murder

अत्याचार, बलात्कार, खून, हत्या, अपहरण अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. काका आणि पुतण्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपूरच्या पाचपावली पोलीस स्थानका अंतर्गत घडली आहे. पाचपावली येथे राहणाऱ्या पुतण्याने काकाच्या घरात घुसून त्यांचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी पुतण्याला अटक केली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सारंग मेश्राम (३३) याच्या वडिलांचे काका अशोक मेश्रामसोबत गेल्या नऊ वर्षापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा सारंग मेश्रामच्या डोक्यात राग होता. याच रागाच्या भरात त्यांनी काकाची हत्या करण्याचे ठरवले. दरम्यान, एक दिवसापूर्वी काका आणि पुतण्याचे भांडणही झाले होते. त्यांच्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले.

काठीने बेदम मारहाण करुन केली हत्या

अशोक मेश्राम हे एका चिकनच्या दुकानात कामाला होते. तसेच त्यांना दारुचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. त्यामुळे ते घरात एकटे राहत होते. दरम्यान, पुतण्या आणि काकांमध्ये पुन्हा एकदा जुन्या वाद उफाळून आला. रागाच्या भरात काकांनी पुतण्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हाच राग मनात ठेऊन रात्री काका मेश्राम दाऊ पियुन घरी झोपला होता. त्याचवेळी पुतण्या सारंग घरी आला आणि त्यांनी काकाला काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अशोक मेश्राम यांच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सांरगला अटक केली आहे.


हेही वाचा – अनैतिक संबंधाचा संशय; दोन्ही हात, पाय व मुंडके धडापासून केले वेगळे