घरताज्या घडामोडीरेमेडेसिवीरचे इंजेक्शन म्हणून पॕरासिटामॉल भरून विक्री, पोलिसांकडून ४ जण अटकेत

रेमेडेसिवीरचे इंजेक्शन म्हणून पॕरासिटामॉल भरून विक्री, पोलिसांकडून ४ जण अटकेत

Subscribe

कसा लागला प्रकरणाचा छडा, जाणून घ्या

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. दिवसाला ५० हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. वाढता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची परिस्थिती भयावह झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. यामध्येच रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात औषधांची आणि ऑक्सिजन, रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची गरज पडत आहे. याचाच फायदा काही नफेखोर आणि गोरखधंदा करणारे घेत आहा. पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये चक्क रेमडेसिवीरच्या कुपीमध्ये पॅरासिटामॉल मिसळून विक्री करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रेमडेसिवीरच्या नावाखाली कुपीमध्ये चक्क पॅरासिटामॉलची विक्री केली जात होती. यामध्ये ४ आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे इंजेक्शन चक्क ३५ हजार रुपयाला विकले जात होते. यामध्ये पहिले एका युवकाला पकडले असता चौकशी दरम्यान त्याने ३ जणांची नावे घेतली आहेत. तसेच या प्रकरणी अधिक चौकशी पोलिस करत आहेत.

- Advertisement -

कसा लागला प्रकरणाचा छडा

बारामती शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी एक युवकाचा वापर करुन पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी एक इंजेक्शन ३५ हजार या प्रमाणे दोन इंजेक्शन ७० हजार रुपये दराने घेतले. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. दवाखान्यातील कर्मचारी रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या या टोळीला देत आणि नंतर सिरिंज द्वारे या बाटलीमध्ये पॅरासिटामॉल मिसळून पुन्हा सील करुन विकल्या जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत बारामती पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -