घरताज्या घडामोडी२ हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक

२ हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक

Subscribe

पोलीस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्विकारताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२१) पोलीस हवालदाराला अटक केली. सुधीर विश्राम पवार असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

सुधीर पवार यांची नेमणूक म्हसरूळ पोलीस ठाण्यात आहे. या ठिकाणी एका तक्रारदाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने तक्रारदाराकडे २ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करत सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच स्विकारताना पोलीस हवालदार सुधीर पवार याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -