घरताज्या घडामोडीअजित पवारांच्या बैठकीत शिरण्याचा मराठा समाजाच्या तरुणाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

अजित पवारांच्या बैठकीत शिरण्याचा मराठा समाजाच्या तरुणाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Subscribe

अजितदादांनी प्रचंड पावसात पोलीस उभे असल्याचे पाहून गार्ड ऑफ ऑनर नाकारला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आणि खरीप पेरणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपेही होते. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अजीत पवार यांची बैठक झाली या बैठकीत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. बैठकीदरम्यान मराठा समाजाच्या तरुणाने अजित पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी या तरुणाला कार्यालयात जाण्यापासून रोखलं यामुळे तरुणाने घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी तरुणाने दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याती दौऱ्यावर असताना या तरुणाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हनुमान फफाळ असं या तरुणाचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. तरुणाने कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अडवल्यावर अजित पवार यांना भेटण्याची मागणी केली परंतु तरुणाला जाऊ दिले नाही म्हणून त्याने एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरु केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात देण्यात आल्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

महिला कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज

बीडमध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडवला होता. यावेळी कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून महिला कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान, “आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करत आहोत. मात्र, शासनाकडून मनाला वाटेल तेव्हा आम्हाला काढलं जातं आणि पुन्हा कोरोना जास्त पसरला की आम्हाला घेतलं जात आहे. यामुळे आम्ही ज्या पदावर काम करतो त्या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्या. ही मागणी घेऊन बीडमध्ये शेकडो महिला आणि पुरुष कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तर या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला आहे.

अजितदादांनी गार्ड ऑफ ऑनर नाकारला

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अजित पवार आणि राजेश टोपेंसाठी पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उस्मानाबाद कार्यालयासमोर तयारी केली होती. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत होता अजित पवार पोहोचल्यावर पोलीस गार्ड ऑफ ऑनरसाठी पुढे आले परंतु प्रचंड पावसात पोलीस उभे असल्याचे पाहून गार्ड ऑफ ऑनर नाकारला आणि कार्यालायत प्रवेश केला.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -