घरमहाराष्ट्रभिवंडी-वाडा महामार्गवर पिस्तूलाचा धाक दाखवून लुटणारे गजाआड

भिवंडी-वाडा महामार्गवर पिस्तूलाचा धाक दाखवून लुटणारे गजाआड

Subscribe

भिवंडी-वाडा महामार्गावर पिस्तूल दाखवून लुटणाऱ्या दोघां जणांचा पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे आरोपी भिवंडीमधील राहणारे होते.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीतील धोंडवडवली या ठिकाणी वाडा भिवंडी महामार्गवर भिवंडीच्या दिशेने जात असलेल्या एका टेम्पोला थांबवून चालकास पिस्तूलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघा व्यक्तींना पोलिसांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. ही घटना काल संध्याकाळच्या वेळेस घडली.

या प्रकरणात आरोपी अब्दुल राजीद मुजित कुरेशी (वय ३२) आणि रोशन महमंद अली शेख (वय ३२) या दोघां मित्रांना पकडण्यात आले आहे. आरोपी अब्दुल कुरेशी हा मुळचा कलकत्ताचा असून तो सध्या कुडून येथे राहतो. तर रोशन शेख हा भिवंड येथील शांती नगरमध्ये राहतो.

- Advertisement -

काल संध्याकाळी कुडूस येथून जिप्सम कंपनीचा माल वाहतूक करणारा टेम्पो हा वडपे भिवंडी येथे जात होता. सदर टेम्पो भिवंडी वाडा महामार्गावर धोंडवडवली येथे आल्यावर या दोघांनी रिक्षातून पाठलाग केला. नंतर आरोपींनी टेम्पो समोर रिक्षा आडवी लावून ड्रायव्हरवरच्या कानशिलावर पिस्तूल ठेवली. ड्रायव्हरच्या जवळील ११०० रुपये आणि मोबाइल हिसकाऊन घेतले. त्याच दरम्यान या महामार्ग वर गस्त घालणारे पोलीस नाईक दिनेश चन्ने यांना स्थानिक नागरिकांनी फोन केला असता त्यांनी या दोघांचा पाठलाग करून शिताफीने पकडले. हे दोघे वडवली येथे रिक्षा घेऊन पळत होते. पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर झडती घेतली. या दोघा जवळ दोन देशी कट्टे आणि पिस्तुल आढळून आली. यावेळी घटनास्थळी गणेशपुरी पोलीस ठाणेचे सपोनि महेश सागडे, पोलिस उपनिरीक्षक विशाल वायकर यांनी दोघा आरोपीना अटक करून गजाआड केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -